बिहारची कुमारी सिंह बनली जगासाठी प्रेरणास्थान, तिला या कामासाठी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार


नवी दिल्ली: बिहारमधील भोजपूर जिल्ह्य़ातील कुमारी सिंह हे नाव संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान बनले आहे. स्विसच्या महिला विश्व समिट फाउंडेशनच्या वतीने तिला तिच्या उत्कृष्ट कामासाठी वुमेन्स क्रिएटिविटी इन रुरल लाइफ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उच्चवर्गाच्या मुलांसारखे दलित समाजातील मुलांना शिक्षण देण्याचे काम केल्याबद्दल तिला हा हा सन्मान देण्यात आला आहे. या मुलीने २०१४ मध्ये रत्नापूर गावातून आपल्या या काम सुरु केली.

कुमारी याबाबत सांगते कि अशा लहान मुलांना शिकवण्याची प्रेरणा तिला तिच्या आध्यात्मिक गुरुकडे गेल्याने मिळाली. देशभरातील १०१ खेडयातील मुलांना शिक्षण देण्याची तिची इच्छा आहे. हा सन्मान मिळवणारा ती सर्वात युवा उमेदवार आहे. कुमारी आपल्या परिसरातील त्या वर्गातील मुलांसाठी देखील काम करते ज्यांच्या पालकांकडे स्वतःच्या जमिनी नाहीत आणि ते फक्त मजुरी करून आपले पोट भरतात. कुमारीने सुरुवातीला या कार्यक्रमात शाळेतून येणा-या अशा मुलांना ट्यूशन देणे सुरु केले जे शाळेत आल्यावर फक्त फिरण्याचे काम करत होते.

लहान मुलांना शिकवत असताना तिने त्या मुलांच्या पालकांचाही त्यांच्यासोबत समावेश केला. तिने सर्वांना महिन्याला किमान २० रुपये बचत केली असे सांगितले. नंतर त्यांनी हा पैसा सर्वसाधारण बँकेत जमा करणे सुरू केले. जेव्हा गावातील लोकांनी यापासून फायदा व्हायला सुरुवात झाली, तेव्हा त्यांनी कुमारीजवळ जवळपासच्या गावातील महिलांनाही पाठविणे सुरू केले. याबरोबरच आजूबाजूच्या गावातील मुले व मुलीही तिच्याजवळ यायला लागले.

बघता बघता १०० मुलांसह सुरु केली शिकवणी १००० मुलांपेक्षा जास्त झाल्यानंतर कुमारीने लोकांच्या मदतीने गावातील जनतेसाठी हात पंप आणि शौचालये तयार केली.