Amityच्या विद्यार्थिनीला मायक्रोसॉफ्टचे १.०३ कोटींचे पॅकेज


नोएडा – Amity स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीची माजी विद्यार्थिनी कथा चंदा हिला दरवर्षी १.०३ कोटी रुपये पॅकेज मिळाले आहे. अमेरिकन मायक्रोसॉफ्ट कंपनीने विद्यार्थिनीला नोकरीची ऑफर दिली आहे.

तिने Amityमध्ये बी.टेक (सीएसई) चे शिक्षण घेतले असून बीटेक करतानाच तिने सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाइनमधील एका मोठ्या प्रकल्पावर काम केले. तिची आवड शोध आणि परिवर्तनामध्ये आहे.

याबरोबरच तिने मेडिकल इमेजिंग समस्येवरही काम केले. कथा चंदा मायक्रोसॉफ्ट कंपनीतील नोकरीवर मार्चमध्ये रुजू होणार आहे. तिथे ती एका अशा टीमचा हिस्सा असेल ज्यात सुरक्षा व्यवस्था तयार केल्या जातात.

Leave a Comment