२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद!


नवी दिल्ली – मोठ्या प्रमाणात २ हजार रुपयांच्या नोटा छापणे भारतीय रिझर्व्ह बँकेने बंद केले असल्याचे भारतीय स्टेट बँकेच्या इकोफ्लॅश अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत एसबीआयने बनवलेल्या अहवालानुसार आर्थिक व्यवहारात २ हजार रुपयांची नोट ही देव-घेव करताना अडचणीचे ठरते. आरबीआयने त्यामुळे या नोटांचे प्रमाण कमी केले असावे किंवा ही नोटच बंद केली असावी, असे एसबीआयच्या अहवालात नमूद केले आहे. या २ हजार रुपयांच्या नोटा नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर चलनात रोकड उपलब्ध करताना मोठ्या प्रमाणात छापण्यात आल्या होत्या.

बाजारात उपलब्ध असलेल्या कमी मूल्यांच्या नोटा या केवळ ३५ टक्क्यापर्यंत पोहोचल्या असल्याचे एसबीआय समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांति घोष यांनी म्हटले आहे. ८ डिसेंबर २०१७ पर्यंत रिझर्व्ह बँकेने १५,७८,७०० कोटी रुपये मूल्य असलेल्या मोठ्या नोटांची छपाई केली आहे. यात आरबीआयने अद्याप २,४६,३०० कोटी रुपये मुल्यांच्या नोटा व्यवहारात आणलेल्या नाहीत. तसेच २,४६३ अब्ज रुपये मुल्यांच्या २ हजार रुपयाच्या नोटा बाजारात उपलब्ध करण्याऐवजी ५० आणि २०० रुपयाच्या छोट्या चलनी नोटा आरबीआयकडून जारी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सरकारने रदद् केलेल्या ५०० रुपये व हजार रुपयांच्या रद्द केलेल्या नोटा बाजारात ८६ ते ८७ टक्के चलनात होत्या.

Leave a Comment