विनाचालक मर्सिडीज बस रस्त्यावर आली


जर्मनीची ऑटोमेकर कंपनी मर्सिडीजने त्यांच्या विनाचालक बसच्या यशस्वी चाचण्या नेदरलँडमधील अॅमस्टरडॅममध्ये घेतल्यानंतर ही बस आता जर्मनीतील रस्त्यांवर दाखल झाली आहे. या बसचा वेग ताशी ७० किमी असून या बसचे नियंत्रण पूर्णपणे दहा कॅमेर्‍यांच्या हातात आहे असे समजते.

बसमधील कॅमेरे बसच्या मागच्या पुढच्या मार्गावर नजर ठेवण्याचे काम करतात. तसेच बसमध्ये संपूर्ण ऑटोमॅटिक व्यवस्था असून त्यामुळे रेड लाईट लागल्यानंतर कुठे थांबायचे, हिरवा सिग्नल झाल्यानंतर पुढे जायचे तसेच लेनची माहितीही या बसला आहे. समोरून कुणी आल्यास वेग कमी करणे हे कामही आपोआपच केले जाते. जर्मनीत यापूर्वीच विनाचालक कारना परवानगी दिली गेली आहे. मात्र मंजुरीपूर्वी वाहनात ब्लॅक बॉक्स लावणे बंधनकारक केले गेले आहे. आता विनाचालक बसचा शोध हा वाहतूक क्षेत्रात क्रांतीकारी ठरेल असा दावा व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment