फेसबुकसोबत डाटा शेअर करणे बंद करा; फ्रान्सची व्हॉट्सअॅपला नोटीस


लंडन – व्हॉट्सअॅपला नोटीस बजावून फेसबुकसोबत डाटा शेअर करणे बंद करा, अशी सूचना फ्रान्सच्या प्रायव्हसी एजन्सी सीएनआयएलने (नॅशनल डाटा प्रोटेक्शन कमिशन) दिली आहे. व्हॉट्सअॅपला यासाठी एका महिन्याचा कालावधी देखील देण्यात आला आहे.

आपल्या अहवालात सीएनआयएलने म्हटले आहे, की संरक्षणासाठी कंपनीचे डाटा शेअरिंग करणे मान्य आहे. पण यूजर्सच्या डाटाचा वापर बिझनेससाठी करणे अयोग्य असून हे व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्सला कधीच सांगितले नाही की, ते यूजर्सच्या डाटाचा वापर बिझनेससाठी करु शकतात, असेही या अहवालात म्हटले आहे. यूजर्सला यापासून बचावण्यासाठी अॅपमध्ये कोणतेही ऑप्शन देखील नाही. यूजर्सच्या खासगी माहितीचे जे उल्लंघन आहे.

जर्मनीने देखील यापूर्वी व्हॉट्सअॅपला फेसबुकसोबत डाटा शेअरिंग बंद करण्याचा आदेश दिला होता. तसेच यूकेमध्ये देखील फेसबुकने आदेश दिल्यानंतर व्हॉट्सअॅप डाटा शेअरिंग बंद केले आहे. भारतामध्ये देखील सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅप आणि फेसबुकला निर्देश दिले आहेत, की ते कोणत्याही तिसऱ्या घटकाकडे यूजर्सचा डेटा शेअर करु शकत नाहीत.

व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी गेल्या वर्षी २५ ऑगस्ट २०१६ रोजी अपडेट झाली होती. हे प्रकरण तेव्हापासून सुरू आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसीनुसार कंपनी संरक्षण आणि जाहिरातीसाठी व्हॉट्सअॅप यूजर्सच्या डाटाचा वापर करू शकते.

Leave a Comment