केवळ १० पैशांत १ किमी धावणार ओकिनोवाची इलेक्ट्रीक स्कूटर


ओकिनोवा कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर प्रेझ भारतात मंगळवारी लाँच केली असून ही स्कूटर अगदी कमी खर्चात युजर चालवू शकणार आहे. ही स्कूटर चालविण्यासाठी प्रति किलेामीटर १० पैसे इतका मामुली खर्च करावा लागेल असा कंपनीचा दावा आहे. या स्कूटरचे प्री बुकींग सुरू झाले असून दोन हजार रूपये भरून ही नोंदणी करता येणार आहे. महिना अखेरी या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होत आहे. कंपनीची भारतीय बाजारातील ही दुसरी स्कूटर आहे. यापूर्वी त्यांनी रिझ स्कूटर लाँच केली आहे. मात्र प्रेझ ही पहिली इलेक्ट्रीक स्कूटर असून तिची किंमत आहे ५९८८९ रूपये.

या स्कूटरला साईड स्टँड सेन्सर, कीलेस एंट्री, फाइंड माय स्कूटर फंक्शन, एलईडी टेललाईट, इंडिकेटर्स दिले असून ती ३ स्पीड मोडमध्ये उपलब्ध आहे. इकॉनॉमर, स्पोर्ट व टर्बो असे हे तीन स्पीड मोड आहेत. ही स्कूटर २ तासांत फुल चार्ज होते व एकदा चार्ज केल्यानंतर १७० ते २०० किमी जाते असाही दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment