५०० च्या नव्या नोटा छापण्यासाठी ५ हजार कोटींचा खर्च


नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून नोटाबंदीनंतर बाजारात नव्याने दाखल करण्यात आलेल्या ५०० रुपयांच्या नव्या नोटांचा छपाई खर्च साधारण ५ हजार कोटी असल्याचे सांगण्यात आले. ५०० रुपयांच्या १६९५३७ कोटी नव्या नोटा 8 डिसेंबरपर्यंत छापण्यात आला आहेत. ४,९३८.८४ कोटी रुपये खर्च नवीन नोटा छापण्यासाठी आल्याचे अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

२००० रुपयांच्या ३६५.४ कोटी नोटा आरबीआयने छापल्या असून त्यांचा खर्च १२९३.६ कोटी रुपये आला. याव्यतिरिक्त २०० रुपयांच्या नव्याने दाखल करण्यात आलेल्या नोटांच्या छपाईचा खर्च ५२२.८३ कोटी रुपये होता. नोटांच्या छपाई खर्चात वाढ झाल्याने २०१६-१७ मध्ये ३५२१७ कोटी रुपये आरबीआयकडून परत करण्यात आले आहे. २०१५-१६ मध्ये अधिक असणा-या ६५८७६ कोटी आणि २०१६-१७मध्ये ३०६५९ कोटी रुपये परत करण्यात आले होते.

Leave a Comment