प्रसूतीपूर्वी रुग्णालयात परीक्षा देऊन ती बनली अनेकांचे प्रेरणास्थान


तुम्हाला जर परीक्षा सर्वात कठीण आहे असे वाटते की, तर नायजीया थॉमसला भेटा. ती एक आई असून सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असल्यामुळे ती इंटरनेट वापरणाऱ्या युझर्सची प्रेरणास्थान बनली आहे. ती हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी आधी परीक्षा देत आहे. ११ डिसेंबर रोजी नायजीयाचा हा फोटो तिच्या आईने क्लिक केला होता. त्यात ती लॅपटॉपवर काहीतरी टाइप करीत आहे.

नायजीया थॉमस अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये मानसशास्त्र हा विषय शिकत आहे. तिची प्रसूतीची तारीख आणि परीक्षा एकत्र आल्याने मोठी पंचाईत झाली. पण, आपली परीक्षा काही झाले तरी अर्धवट राहता कामा नये हा विचार तिच्या मनाशी पक्का होता. म्हणूनच तिने प्रसूत होण्याआधी आपली परीक्षा दिली. रुग्णालयाच्या बेडवर लॅपटॉप घेऊन परीक्षा देत असलेल्या नाझियाचा फोटो तिच्या आईने टिपला. विशेष म्हणजे परीक्षा देऊन झाल्यानंतर काही अवधितच ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला आणि परीक्षाही ती चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली.


गरोदर राहिल्यानंतर ती 9 महिन्यापर्यंत ती कॉलेजमध्येच जात होती आणि अभ्यास करत होती. सोशल मीडियावर तिचा फोटो खूपच व्हायरल होत आहे. आतापर्यंत तिच्या फोटोला १.३ लाख लाईक्स पसंती आणि २७ हजार रिट्वीट्स झाले आहे.

Leave a Comment