मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार कमी पैसे


नवी दिल्ली – आतापर्यंत आपला नंबर दुसऱ्या कंपनीच्या सेवेसाठी पोर्ट करण्यासाठी मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांना १९ रूपयांचे शुल्क मोजावे लागत होते. पण लवकरच हे शुल्क घटवण्यात येणार असून यासाठीचा प्रस्ताव दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) मांडला आहे.

१ जानेवारी २०११ पासून नेटवर्क वर्तुळातील दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्याची मुभा देणारी नंबर पोर्टेबिलिटी ही सुविधा सुरू करण्यात आली. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने या सेवेसाठी नोव्हेंबर २००९ मध्ये १९ रुपये शुल्क निश्चित केले होते. पण, हे शुल्क लवकरच घटून ४ रुपये होणार आहे. ग्राहकांची गैरसोय मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या सुविधेमुळे मोठ्याप्रमाणावर कमी झाली. या सुविधेसाठी सुरूवातीच्या काळात १९ रूपये आकारले जाणे योग्य होते. पण हे शुल्क आताच्या काळात जास्त असल्याचा अभिप्राय नोंदवत ट्रायने नंबर पोर्टेबिलिटीच्या सुविधा शुल्कात ८० टक्क्यांनी घट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

Leave a Comment