जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आणला ४९ रूपयांचा नवा प्लॅन


मुंबई- टेलिकॉम कंपन्या सध्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी डेटाप्लॅनच्या विविध ऑफर्स देत आहेत. नुकताच रिलायन्स जिओने ५२ रूपयांचा एक डेटाप्लॅन युजर्ससाठी आणला आहे. पण एअरटेल कंपनीने जिओच्या या प्लॅनला टक्कर देण्यासाठी नवा प्लॅन बाजारात आणला आहे. युजर्सला एअरटेलचा हा नवा प्लॅन ४९ रूपयांमध्ये मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी एका दिवसाची असून यामध्ये ३जी/४जी स्पीडने १ जीबी डेटा मिळेल. याचबरोबर एअरटेलने १ जीबी डेटा असणारे दोन नविन प्लॅनही आणले आहेत, पण त्यासाठी अधिक किंमत मोजीवी लागणार आहे. ९९ रूपयांचा प्रिपेड डेटाप्लॅन एअरटेलने सुरू केला असून त्यामध्ये २ जीबी ३जी/४जी डेटा मिळणार आहे. ५ दिवसांची या पॅकची व्हॅलिडीटी असेल. तसेच ९८ रूपयांचा एक प्लॅन असून त्यामध्ये १जीबीचा २जी/३जी/४जी डेटा २८ दिवसांसाठी मिळणार आहे.

Leave a Comment