मायक्रोसॉफ्ट आणणार ड्युल स्क्रीनचा संगणक


जगात सर्वप्रथम दोन स्क्रीन असलेले तरीही संपूर्ण उघडताच सलग स्क्रीन दिसणारा फोल्डेबल संगणक मायक्रोसॉफ्ट लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत असल्याचे समजते. आयएएनएसच्या अहवालानुसार नवीन फ्यूचर टेक्नॉलॉजी असलेले हे नोटबुक हँडी असेल व बाजारात येताचे ते नवी क्रांती घडवेल. हे नोटबुक म्हणजे प्रत्यक्षात दोन स्क्रीन पण उघडताच सलग स्क्रीन दिसणारे एजलेस गॅझेट आहे. यात कुठेही एक्स्ट्रा स्पेस रिकामी दिसणार नाही.

वास्तविक २००८ मध्येच ही कन्सेप्ट मायक्रोसॉफ्टने आणली होती मात्र त्यांचे विंडोज फोन बाजारात म्हणावे तसे यशस्वी न झाल्याने ही कल्पना पुढे ढकलली गेली. आता मात्र हा संगणक पूर्णपणे विकसित केला गेला आहे व लेनोवोच्या योगा टॅब्लेटप्रमाणे तो दिसेल व त्यापेक्षाही जाडीला पातळ असेल. अमेरिका पेटंट ट्रेकमार्क ऑफिसकडे या मॉडेलसाठी पेटंट फाईल केले गेले आहे. या नोटबुकचे डिझाईन वेगळे आहे. याच्या दोन स्क्रीनमध्ये रिकामी जागा नाही. मिळालेल्या माहितीनुसार नव्या वर्षात याचे बेस मॉडेल बाजारात लाँच केले जाईल.

Leave a Comment