या देशात मृतदेहांना टाकले जाते उघड्यावर… पण का?


मृतदेहांना मैदानावर टेक्सासमधील एका भागात उघडे टाकून दिले जाते. येथे मृतदेह एका लोखंडाच्या पिंजऱ्यात ठेवून मैदानावर तशीच ठेवून दिली जाते. या बॉडी फार्मचे मन हेलावून टाकणारे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले आहेत. येथे दान केलेल्या मृतदेहापासून ते अनोळखी लोकांचे मृतदेह ठेवले जातात.

टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटीचे Scientists at The Forensic Anthropology Centre नुसार शव सडण्यासाठी याठिकाणी जाणूनबुजून ठेवले जातात. खुल्या वातावरणाचा काय प्रभाव या शवांवर पडतो याचे निरीक्षण करण्यासाठी असे केले जाते. या कारणामुळे ६ महिन्यांपर्यंत येथे मृतदेह उघड्यावर ठेवले जातात. येथे ठेवण्यात आलेल्या मृतदेहात अज्ञात लोकांचाही समावेश असतो. तर काही लोक स्वतःच्या इच्छेनुसार येथे शव दान करून जातात.

येथे शव घेऊन येण्यापूर्वी वैज्ञानिक त्या मृतदेहाचे वजन २२० किलोपेक्षा कमी आहे की नाही याची पडताळणी करतात. तसेच मृत व्यक्तीला हेपेटाइटिस-सी किंवा इतर संक्रमित रोग होता की नाही हे तपासले जाते. या ठिकाणी जवळपास ७० मृतदेह आहेत.

Leave a Comment