व्हॉट्सअॅप अशा प्रकारे कमवते पैसे ?


मुंबई : सध्याच्या घडीला व्हॉट्सअॅपचा वापर कोण करत नाही असा शोधून सापडणार नाही. आजमितीस व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जवळपास १ अरबच्या घरात आहे. व्हॉट्सअॅपची ही सुविधा अगदी मोफत असली तरी मोफत सुविधा देणाऱ्या व्हॉट्सअॅपवर कुठलीच जाहिरात आपल्याला पहायला मिळत नाही. मग तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल कि एवढा मोठा डोलारा चालवण्यासाठी नेमके भांडवल येते तरी कोठून ? पण आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या कमाईबद्दल सांगणार आहोत.

२०१४ मध्ये १९ अरब डॉलर्समध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप खरेदी केले. आता मायक्रो अॅडव्हर्टायझिंगचं बोलायचे झाले तर तुमच्याबाबत फेसबुकला खूप काही माहिती असते. कंपनी याच माहितीचा वापर आपल्या कमाईसाठी करते.

फेसबुक तुमच्या व्हॉट्सअॅपचा डेटा पाहू शकते आणि तुम्हाला केवळ आणि केवळ त्याच प्रोडक्टची जाहिरात दाखवू शकतो ज्या प्रोडक्ट्सची तुम्हाला गरज आहे. पण कंपनी तुमच्या व्हॉट्सअॅपमधील मेसेजेस वाचत नाही असा दावा व्हॉट्सअॅपने केला आहे.

तुम्ही आपल्या मित्रांना अनेकदा एखाद्या प्रोडक्टची लिंक शेअर करता आणि त्याचप्रमाणे तुमचे मित्रही अशाच प्रकारची एखाद्या प्रोडक्टची लिंक तुमच्यासोबत शेअर करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फेसबुकला कळते की तुम्हाला नेमके काय हवे आहे.

तसेच फेसबुक इतर दुसऱ्या कंपन्यांना तुमचे नाव सुचवूनही पैसे कमवते. याचा अर्थ तुमची वैयक्तीक माहिती विकली जात असे नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअॅपच्या लीगल पेजवर विझिट करु शकता.

Leave a Comment