‘ही’ भारतीय महिला डॉक्टर आहेत मदर टेरेसा ऑफ द डेजर्ट


नागपूरच्या एका मराठी महिला डॉक्टरने आपल्या परिश्रम आणि चिकाटीने खाडीच्या देशांतील अरबी लोकांची हृदय जिंकली आहेत आणि त्या तेथेच कायम स्थायिक झाल्या आहेत.

आज ५० वर्षांहून अधिक काळानंतर त्यांनी विश्रांती घेतली असली तरी त्या अजूनही त्यांच्या रूग्णांशी संलग्न आहेत. पण त्या आपल्या देशाला व त्यांच्या शहराला विसरलेल्या नाही. त्या अजूनही हिंदी भाषा आपल्या मराठी शैलीत बोलत आहेत. त्यांच्याकडे आजही भारताचा पासपोर्ट आहे.

त्या आहेत ८० वर्षीय जुलेखा दाऊद, ज्या संयुक्त अरब अमिरातमधील भारतीय वंशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. आज त्यांची तीन रुग्णालये असून त्यातील एक रुग्णालय नागपूरमध्ये आहे. पण जेव्हा त्या प्रथमच शारजात आल्या तेव्हा तिथे एकही हॉस्पिटल नव्हते.

त्या तेथे स्त्रीरोगतज्ञ म्हणून गेल्या होत्या, पण तेथे डॉक्टरांच्या अभावामुळे त्यांना प्रत्येक रोगाचा इलाज करावा लागला. त्या त्यावेळी कट्टरपंथी अरब सोसायटीतील एकमेव महिला डॉक्टर होत्या. पण त्यांच्या लक्षात आले की येथील लोकांना त्यांची आवश्यकता आहे.
त्या म्हणतात, मी नागपूरहून येथे कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी आले होते. कुवेती लोकांनी सांगितले की, या लोकांना (शारजामधील) आपल्यापेक्षा जास्त गरज आहे. आम्ही तेथे हॉस्पिटल उघडत आहोत, म्हणून त्यांनी मला येथे पाठवले.

त्या कुवेतमधील एका अमेरिकन मिशन हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. त्या हॉस्पिटलने शारजामध्ये क्लिनिक उघडले. शारजा आणि दुबई इतक्या पिछाडीवर होते की डॉक्टर तेथे जाण्यास तयार नव्हते. डॉक्टर दाऊद पुढे म्हणाल्या, मला येथे सर्वकाही करावे लागले. डिलिवरी आणि लहान ऑपरेशन, हाडांचे, भाजलेल्या लोकांचा इलाज मला करावा लागला कारण इतर कोणीही येथे नव्हते.

त्यावेळी डॉ. दाऊद एक तरुण स्त्री होत्या आणि नुकतेच त्यांचे एका भारतीय डॉक्टरशी विवाह झाला होता. दुबई आणि शारजाह यांच्याविषयी त्यांना कमी माहिती होती. त्या म्हणतात, दुबई काय आहे हे मला माहिती नव्हते. मला काम करायचे होते म्हणून मी येथे आले. त्यावेळी दुबई आणि शारजाह बद्दल सांगताना त्या म्हणतात, कोणतेही विमानतळ नव्हते, आम्ही धावपट्टीवर उतरलो तर इतर डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही येथे राहू?

दुबईमध्ये प्रथम क्लिनिक उघडले होते मग शारजामध्ये. डॉ. दाऊद सांगतात कि, शारजाह दुबईपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे. त्यावेळी येथे पक्का रस्ता नव्हता. डॉ. जुलेखा दाऊद त्या वेळेची आजही आठवण काढतात आणि म्हणतात शारजामधील रस्ते वाळवंटी होते. गाडी रेतीमध्ये अडकली होती, आम्हाला काहीच कळत नव्हत की येथे इतक्या समस्या का होत्या.

हॉस्पिटलही व्यवस्थांची कमी होती. मी येथे आले तेव्हा क्लिनिकमध्ये मला फक्त दोन-तीन प्रकारच्या औषधे दिसली. तिथे एक्स-रे सुविधा नव्हती ना पॅथॉलॉजी विभागही होता. खूप उष्णता होती आणि बाकीच्या डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही येथे राहू शकत नाही. मी म्हणाले, मी येथे उपचार करण्यासाठी आले आहे आणि लोकांना माझी गरज आहे.

डॉ. दाऊद हे एक लोकप्रिय डॉक्टर असून शारजा आणि दुबईमध्ये १५,०००हून अधिक मुलांचा जन्म त्यांच्या देखरेखीखाली झाला आहे. त्यात बऱ्याच शाही कुटुंबातील लोकांचा समावेश होता. त्यांनी अरबांच्या तीन पिढ्यांवर उपचार केले आहेत. उतरत्या वयातही त्या दररोज आपल्या रुग्णालयात येतात आणि रुग्णांना भेटतात.

पुढे आखाती देश स्वतंत्र झाले. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाले. १९७१ मध्ये संयुक्त अरब अमिराती हा देश स्थापन झाला. आणि तिथून पुढे या देशाची झालेली प्रगतीही त्यांनी जवळून पाहिली आहे. पुढे १९९२ मध्ये झुलेखा यांनी स्वत:चे रुग्णालय सुरु केले. पन्नास वर्षांत त्या दुबईच्याच होऊन गेल्या. पण, आपले जन्मगाव नागपूर कधीही विसरल्या नाहीत.

सुरुवात करताना भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे त्यांनाही माहीत नव्हते. पण, पुढे यश गवसल्यावर त्या जुन्या ओळखी विसरल्या नाहीत. त्याच वेळी आपला देशही त्या विसरलेल्या नाहीत. त्यांचे भारतीय नागरिकत्व आजही कायम आहे. रुग्णसेवेसाठी त्यांनी नागपूरमध्येही एक सुसज्ज रुग्णालय उभारले आहे. आता त्यांची मुलगी आणि जावई त्यांचे काम पुढे घेऊन जात आहेत.

Leave a Comment