गुगलवर २०१७ मध्ये सर्वाधिक ‘सर्च’ केली गेली ही ठिकाणे


गुगल तर्फे, २०१७ या वर्षामध्ये सर्वात जास्त ‘ सर्च ‘ केल्या गेलेल्या ‘ ट्रॅव्हल डेस्टीनेशन्स ‘, म्हणजेह पर्यटनस्थळांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या पर्यटनस्थळांबद्दल जगभरातील पर्यटकांनी गुगल द्वारे माहिती शोधली आहे. गुगल तर्फे दरवर्षी सर्वांत प्रसिद्ध पर्यटनस्थळांची यादी जाहीर केली जाते.

या यादीमध्ये सर्वात पहिले स्थान मिळाले आहे लास वेगास या ठिकाणाला. झगमगत्या कॅसिनोज् आणि क्लब्स यांनी नटलेले हे शहर अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय शहरांपैकी एक आहे. ‘लास वेगास बुलेवार्ड’ हा येथील सर्वात लोकप्रिय कॅसिनो असून, हे शहर अतिशय सुंदर आहे.

स्पेनमधील बार्सिलोना हे शहर गुगल वर सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या ठिकाणांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. पर्यटन आणि फुटबॉल साठी प्रसिद्ध असणारे हे शहर, अनेक हेरीटेज साईट्स करिताही ओळखले जाते. येथे असलेले ‘ पोर्ट ऑफ बार्सिलोना ‘ युरोपमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे. अनेक प्रवासी आणि मालवाहू जहाजांचे आवागमन येथे सतत सुरु असते.

अमेरिकेतील साऊथ कॅरोलीना या भागामध्ये असलेला मायटल बीच हा समुद्री किनारा देखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. अतिशय उत्तम खाद्यपदार्थ सर्व्ह करणारी अनेक रेस्टॉरंट्स या ठिकाणी आहेत. इथे असलेली रेस्टॉरंट्स आणि बार येथील मुख्य आकर्षण आहेत.

आस्पेन हे अमेरिकेतील कोलोराडो भागातील ठिकाण रॉकी माऊंटन्सवर आहे. स्कीईंग हा खेळ इथे होत असून, अमेरिकेतील सर्वात महागड्या पर्यटनस्थळांपैकी हे एक आहे.

पुंटा काना ह्या ठिकाणाहून कॅरीबियन समुद्र आणि अटलांटिक महासागर या दोहोंचे दर्शन घडते. त्यामुळे पर्यटकांना या जागेचे अतिशय आकर्षण आहे. हे ठिकाण वॉटर स्पोर्ट्स आणि बोटिंग करिता लोकप्रिय आहे.

मालदीव ह्या ठिकाणी स्क्युबा डायव्हिंग, अंडर वॉटर फोटोग्राफी, स्नोर्केलिंग, सबमरीन, सर्फिंग अश्या जलक्रीडा करण्याच्या सुविधा आणि इथे घडणारे व्हेल आणि डॉल्फिन माशांचे दर्शन या सर्व गोष्टींमुळे हे ठिकाण अतिशय लोकप्रिय आहे. या ठिकाणीही जगभरातून पर्यटक येत असतात.

Leave a Comment