नव्या वर्षी बाजारात दाखल होतेय उडणारी कार


उडणारी कार हे माणसाने पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरले आहे पण पुढच्या वर्षात म्हणजे २०१८ मध्ये अशी उडणारी कार बाजारात दाखल होत आहे. अमेरिकेच्या सॅमसन मोटर्सनी उडती स्पोर्टस कार लाँच केली असून त्याचे व्हिडीओ जारी केले आहेत. ही कार १३ हजार फुटांवरून उडू शकते व तिचा टॉप एअर स्पीड आहे ताशी ३२१ किमी. या दोन सीटर कारमधून २२ किलेा वजनाचे सामान नेण्यासाठीही जागा दिली गेली आहे.

विशेष म्हणजे ही कार ८ लाख रूपयांतच मिळणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार तिचे डिझाईनच असे केले आहे की ती रस्त्यावरही आरामात चालविता येणार आहे. फ्लाईंग मोड ऑन केला की उडू शकणार आहे. हा मोड ऑन केला की कारला दिलेली ब्लेडस बाहेर येतील व कार उड्डाणासाठी तयार होईल. भविष्यात या कार्ससाठी रनवे बनविले जाणार आहेत. सध्या मात्र ती सार्वजनिक विमानतळांच्या रनवेवरूनच उडू शकणार आहे. तीन व्हेरिएंटमध्ये ती उपलब्ध करून दिली गेली आहे.

ही कार खरेदी करणार्‍याला खासगी पायलट परवाना घेणे गरजेचे आहे. रोडवर चालविण्यासाठी तिला पाच स्पीड ट्रान्समिशन दिले गेले आहे तर उडताना पूर्ण कारसाठी पॅराशूट आहे. कारमध्ये डिजिटल डिस्प्ले, हिटींग कुलींग सिस्टीम असून तिची टाकी ३० गॅलनची आहे.

Leave a Comment