अरूंधती भटटाचार्यांची भूमी शय्या व्हायरल


स्टेट बँकेचे अध्यक्षपद चार वर्षे भूषविलेल्या व ही कामगिरी करणारी पहिली महिला बनलेल्या अरूंधती भट्टाचार्य यांचा एक फोटो सोशल मिडीयावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. वर्षाला कोटींमध्ये पगार घेणार्‍या व फॉर्च्यून लिस्टमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला असलेल्या अरूंधती या फोटेात जमिनीवर पसरलेल्या एका कार्पेटवर गाढ झोपी गेलेल्या दिसत आहेत. त्यांच्यावर अशी वेळ का यावी असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ब्रिटीश एअरवेजकडेच मागावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून लंडनला ब्रिटीश एअरवेजच्या विमानातून अरूंधती जात असताना अचानक वाटेतच हे विमान बिघडले व त्याचे अझरबैजानमधील बागू विमानतळावर लँडींग करावे लागले. विमानाच्या दुरूस्तीसाठी तब्बल १९ तासांचा वेळ लागला मात्र या काळात दुसर्‍या देशात असल्याने प्रवासी विमानतळाबाहेर जाऊ शकले नाहीत. १९ तासांचा वेळ म्हणजे तसा बराच मोठा कालावधी. मग या काळात अरूंधतींसह अनेकांनी जमिनीवर पसरलेल्या कार्पेटवर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला व नेमके हेच फोटो टिपले गेले.

Leave a Comment