खादाडांसाठी कांही हटके पदार्थ


खाण्यापिण्याची आवड असणारी जनता जगात बर्‍याच मोठ्या संख्येने आढळेल. अशा वेळी खादाडांची जिव्हा तृप्ती तर होईलच पण आगळे, हटके कांहीतरी खाल्याचे समाधान त्यांना मिळेल या विचाराने जगात असे कांही पदार्थ बनविले गेले आहेत की ते कदाचित ऐकूनही तुम्हाला माहिती नसतील. काय आहेत हे पदार्थ? जाणून घेऊ या.

नखे कुरतड्याची सवय अनेकाना असते व नखे कुरतडणार्‍यांशिवाय बाकीच्यांना ती त्रासदायकही असते. नखे खाण्याची आवड लक्षात घेऊन खास अशा लोकांसाठी एडिबल नेलपॉलिश बाजारात उपलब्ध आहे. हाँगकाँग येथील फास्ट फूडचेनने ते तयार केले असून त्याला चिकनचा स्वाद आहे. त्यात नैसर्गिक पदार्थांचा वापर केला गेला असून ते पोटात गेले तर कोणताही अपाय होत नाही. नखांवर ते लावायचे, सुकू द्यायचे व मग हळून तोंडात बोट घालून चोखायचे. मस्त स्वाद मिळेल याची गॅरंटी.


न्यूयॉर्क येथील एका ब्रेड स्टोअरमध्ये ब्रेड बँगल नावाचा पदार्थ आहे. हे रेनबो सँडविच आहे. बांगडीच्या आकाराच्या या सँडविचमध्ये विविध रंगांचे एकावर एक थर आहेत. वरचा थर खाल्ला की खालचा वेगळ्या रंगाचा थर आहेच.असे सात थर यात आहेत. अशा रितीने हे फस्त करायचे.ड्रिंकिंग क्ले या नावाचाही एक पदार्थ मिळतो. त्याला मातीचा स्वाद आहे. यात स्मूदी, ज्यूस, सुकामेवा याबरोबर खाता येईल अशी मातीही असते. या विचित्र पेयामुळे वजन कमी होते असेही दावा केला जातो.


दुसरा पदार्थ आहे चिकन कार्सेज. हा प्रकार केएफसी मध्ये उपलब्ध आहे. युवा, शालेय विद्यार्थी फ्रेंडशीप डेच्या दिवशी एकमेकांना फ्रेंडशीप बँड बांधतात त्याचीच ही खाद्य आवृत्ती. हे एडिबल कॉर्सेज तुम्हाला तुमच्या ड्रेसच्या रंगाशी मॅचिंग होईल असेही मिळते. ते मनगटावर बांधयचे. भूक लागली की त्याचा फन्ना पाडायचा. त्यात फ्राय चिकन, ड्रम स्टिक म्हणजे आपल्या शेवग्याच्या शेंगा यांचा वापर असतो तसेच सजावटीसाठी हिरवी पाने, फुलेही असतात. पांढर्‍या रिबनच्या सहाय्याने ते हातात बांधता येते.


नूडल्स बर्गर- नूडल्स व बर्गर हे दोन्ही खाद्यपदार्थ जगभरात लोकप्रिय आहेत. एका हुशार शेफने त्याचे फ्यूजन करून नूडल्स बर्गर असाच पदार्थ खवय्यांसाठी आणला आहे. गोडीसाठी बर्गर डोनटचा वापर केला आहे व नूडल्समध्ये तो ठेवला गेला आहे. कोबी, गाजर, कांदा, तुळस व अन्य मसाल्यांचा वापर करून तो हेल्दी व टेस्टी बनविला गेला आहे.