एलजीचा नवा व्ही ३० प्लस भारतात लाँच


एलजीने त्यांचा व्ही सिरीज मधील नवा व्ही३० प्लस हा स्मार्टफोन भारतात लाँच केला असून वायरलेस चार्जिंग, बेझललेस, ड्यूल कॅमेरा एचडी व्हीडीअ्रो रेकॉडिंग अशी त्याची खास फिचर्स आहेत. हा फोन ४४९९० रूपयांत उपलब्ध आहे. या फोनला दिलेल्या खास पॉईंट झूमिंग फिचरमुळे फोटोवर कुठेही टच करून झूम करता येते व व्हिडीओ रेकॉडिंगही करता येते. फोनला ३३०० एमएएच क्षमतेचे क्विक चार्ज तंत्रयुक्त बॅटरी दिली गेली आहे तसेच वायरलेस चार्जिंग ची सुविधाही दिली गेली आहे.

या फोनसाठी व्हॉईस व फेस रिक्गनिझेशन सुविधा आहे तसेच रेकॉर्डिग एचडी मध्येच करता येते. क्लिअर फोटोसाठी एफ १.६ ग्लास लेन्स दिले गेले आहे. गुगल असिस्टंट आहेच पण फोनला अगदी पातळ कड दिली गेली आहे. ६ इंची डिस्प्ले, ४ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी, अँड्राईड नगेट ७.१.२ ओएस, १६ एमपीचा प्रायमरी तसेच १३ एमपीचा सेकंडरी असे दोन कॅमेरे आहेत शिवाय सेल्फीसाठी ५ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे.

Leave a Comment