लंचसाठी निघाली आणि करोडपती झाली


नवी दिल्ली: काहीन करता तुम्हाला जर अचानक मोठा धनलाभ झाला तर काय म्हणाल. असेच काही तरी झाले की तिचे नशीबच उघडले. अमेरिकेतील मेरीलँड येथील ५४ वर्षीय महिलेच्या नशिबाने अशी काही पलटी मारली ज्यामुळे टी करोडपती झाली. सध्या या महिलेची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

अमेरिकेतील ही महिला स्वतःला ‘मिसिसेज मागा फॉर्च्यून’ म्हणून सांगत आहे. जिने १२ कोटी रुपयांची लॉटरी काढली होती. तिने हे ३० डॉलरचे एक स्क्रॅच तिकीट काढले होते. दररोज लंच ब्रेकसाठी बाहेर येणा-या या महिलेने गॅस स्टेशनकडून लॉटरीची बरीच तिकीट खरेदी केले. यानंतर तिने हे तिकीट स्टोअर वर स्क्रॅच केले, पण प्रत्येकवेळी प्रमाणे यावेळी तिला निराश व्हावे लागले नाही. जसे तिने लॉटरीचे तिकीट स्क्रॅच त्यावेळी तिला १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. त्यावेळी तिला काही समजेनासे झाले की याप्रसंगावर आपण कशी प्रतिक्रिया द्यावी. ती घरी पोहचली आणि लॉटरीचे तिकीट संभाळून ठेवले आणि ती ऑफिसवर परत गेली.

तिने याबद्दल ऑफिसमधील कुणालाही याबाबत सांगितले नाही. जशी ती संध्याकाळी घरी परतली तशी तिने ही आनंदवार्ता आपल्या पतीला सांगितली. ती आनंदवार्ता ऐकून तिचा पती आश्चर्यचकित झाला. ही बातम्या ऐकून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू देखील आले. या महिले या तिकिटाच्या कंपनीला सांगितले की, हे पैसे आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करेल आणि आमची संपूर्ण जीवनशैली यामुळे बदलली आहे.

Leave a Comment