अबब! ३५ कोटींची दमदार बाईक टॉमहॉक


जगाच्या बाजारात आज रेसिंग बाईक्सची खूप मोठी रेंज सहज उपलब्ध आहे व रेसिंगचा शौक असणारे त्याबाबत सारी माहिती वेळोवेळी अपडेटही करत असतात. मात्र किंमत व फिचर्स ऐकून तोंडात बोट जाईल अशी एक बाईकही या यादीत असून तिचे नांव आहे टॉमहॉक. डॉज कंपनीची ही बाईक जगातली दमदार बाईक असून तिची किंमत आहे ३५ कोटी रूपये.

या बाईकचे डिझाईन पूर्णपणे वेगळे आहे. तिला बाईक म्हणायचे पण ती दोन चाकी नाही तर तिला चार चाके दिली गेली आहेत. या बाईकला ८.३ लिटरचे व्ही १० एसआरटी वायपर इंजिन दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ती फक्त १.५ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ६७२ किमी. जगात यापेक्षा दुसरी वेगवान बाईक नाही असा कंपनीचा दावा आहे. २००३ सालच्या नॉर्थ अमेरिका इंटरनॅशनल ऑटो शो मध्ये ती सादर केली गेली होती. जगात फक्त नऊ जणांकडे ही बाईक आहे.