सीप्लेनची ही आहे खासियत


गुजराथ निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी सी प्लेनमधून प्रवास करून अंबाजीचे दर्शन घेतले आणि सी प्लेनबद्दल एकच चर्चा सरू झाली. साबरमती रिव्हरफ्रंटवर मोदी उतरले आणि देशात सीप्लेनची वारी करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. सध्या देशभरात अनेक ठिकाणी सीप्लेनच्या चाचण्या सुरू आहेत आणि लवकरच अशी १०० सी प्लेन देशाच्या विविध भागात प्रवासी वाहतूक करणार आहेत.


सीप्लेन ही जमीन तसेच पाण्यावर लँड होऊ शकतात. एका सी प्लेनची किंमत साधारण २५ कोटी रूपये असते. पायलटसह १० प्रवासी यातून प्रवास करू शकतात. त्याची लांबी १५ फूट, वजन १७१० किलो पर्यंत आहे. स्पाईस जेट जपानी कंपनीकडून अशी १०० सी प्लेन खरेदी करणार आहे. देशाचा कानाकोपरा यामुळे जोडला जाणार आहे. मोठी शहरे छोट्या शहरांशी जोडली जातील. मुंबई कांडला, मुंबई पोरबंदर, हैद्राबाद पाँडिेचेरी, दिल्ली जेसलमेर अशा मार्गावर ही विमाने उड्डाण करणार आहेत. १ तासाच्या प्रवास अंतरासाठी २५०० रूपये तिकीट आकारले जाणार आहे.

Leave a Comment