बिटकॉईनला मागे टाकणारी आयोटा करन्सी


आजकाल जगभराच्या आर्थिक क्षेत्रात व्हर्च्युअल करन्सीचे हैराण करणारे कारनामे ऐकू येऊ लागले आहेत. त्यात आघाडीवर आहे ती बिटकॉईन आभासी मुद्रा. ही डिजिटल करन्सी गेल्या कांही दिवसांत इतक्या प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाली आहे की गुंतवणुकीचे सार्‍या मर्यादा तिने पार केल्या आहेत. या करन्सीतील गुंतवणुकीमुळे कुणी कमी वेळात किती प्रचंड पैसे मिळवले याच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरत आहेत. मात्र आभासी चलन असलेली ही एकमेव करन्सी नाही. या करन्सीला मागे टाकणार्‍या आयओटा (आयओटीए) ची चर्चाही आता जोरात सुरू झाली आहे. ही गुंतवणूक उत्पादन करन्सी असून तिने इंटरनेट अर्थ कणा मजबूत करणारी असे नांव कमावले आहे.

नोव्हेंबर २०१७ पासून आत्तापर्यंत या करन्सीत तब्बल ७७४ टक्के वाढ झाली आहे आणि यातील एकूण गुंतवणूक १२ अब्ज डॉलर्सवर केकेली आहे. जगातील पाच सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीत तिचा समावेश आहे. मार्केट वॉच साईटनुसार बिटकॉईन, इथेरियम, बिटकईन कॅश, रिपल आणि आयोटा या पाच व्हर्च्यूयल करन्सी सध्या टॉप पाच मध्ये आहेत.

मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या तंत्र कंपन्यांनी जर्मनीच्या संस्थेतर्फे गुंतवणूक केली असून ही संस्था तिच्या देखरेखीखाली आयोटासाठी सुरक्षित डेटा मार्केट बनवत आहे. या संस्थेचे सीईओ व संस्थापक डेव्हीड संसटोबो यांच्या म्हणण्यानुसार सध्या ९९ टक्के महत्त्वाच्या टीप्स गायब होत आहेत. आयोटा मोफत डेटा शेअर करते शिवाय माहितीची सुरक्षाही करते. ही आभासी करन्सी तीन प्रकारे खरेदी करता येते. खरे चलन देऊन तिची खरेदी करता येते, बिटकॉईन मार्फत उपलब्ध असलेल्या सेवा व उत्पादने विकून ती मिळवता येते किंवा व्हर्च्युअल मुद्रा बनविणार्‍या कंपन्यांकडून ती विकत घेता येते. अर्थात या व्यवहारातील गुंतवणक पूर्णपणे खासगी पातळीवर असून या व्यवहारांसाठी कोणतेही सरकारी नियम कायदे नाहीत.

Leave a Comment