नवीन वर्षात जिओ देणार ग्राहकांना दणका!


मुंबई : सर्वात स्वस्त मोबाईल सेवा देणारी रिलायन्स जिओ कंपनी नवीन वर्षात ग्राहकांना झटका देण्याच्या तयारीत आहे.

जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जिओने गेल्यावर्षी दिवाळी दरम्यान आपले टॅरिफ प्लान महाग केले. आता तुम्हाला धक्का देणारी बातमी अशी आहे की, जिओचे आगामी नवे प्लान महाग असणार आहेत. नवीन रिपोर्टनुसार लवकरच टेलीकॉम ऑपरेटर्समध्ये सुरू असलेला टॅरिफ वॉर संपणार आहे.

या रिपोर्टमध्ये असा करण्यात आला आहे की, आपले प्लान जिओ महाग करू शकते. बाजारात येऊन जिओला एक वर्ष झाल्यानंतर स्वस्त प्लान ठेवले आहेत. अशात दुसऱ्या कंपन्यांनी देखील प्लान स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ओपन सिग्नलच्या रिपोर्टनुसार, भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओच्या बाजारात आगमनानंतर प्राइज वॉर जोरात सुरू झाले आहेत आणि ओपन सिग्नल रिपोर्टने असे सांगितले आहे की, ही परिस्थिती पुढच्या वर्षी देखील अशीच असणार आहे.

रिपोर्टनुसार, जिओचा ४जी मार्केटमध्ये दबदबा कायम आहे. जिओ फ्री आणि डिस्काऊंट डाटा एका वर्षापर्यंत असल्यानंतर २०१८ मध्ये सर्व्हिसच्या किंमतीत वाढ करू शकते. भारतात सध्या मोबाइल पेनेटरेशन रेट ४० टक्के आहे, जो २०२२मध्ये ८० टक्के होणार आहे. त्याचबरोबर LTE सर्व्हिसमध्ये लिडींग रोल प्ले केला जात आहे आणि याचमुळे या वर्षात सतत डेटा युझर्स वाढले आहेत.

Leave a Comment