कर्मचार्‍यांशिवायच दुकान येणार तुमच्या दारात


आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजच्या आयुष्यातही अनेक बदल होऊ लागले आहेत. विनाचालक गाडी आपल्या पचनी पडली आहे. त्याच्या पुढचे पाऊलही टाकले गेले असून आता ऑटोमॅटिक दुकाने घराच्या दारात येणार आहेत. चीनमध्ये असे एक दुकान नुकतेच लाँच झाले आहे. विलीज कंपनीने मोबी स्टोर नावाचे हे स्वयंचलित दुकान सुरू केले असून त्यात किराणासह सर्व प्रकारचा माल उपलब्ध आहे. या दुकानासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.

या चालत्याफिरत्या दुकानाच्या टपावर सौर पॅनल बसविले गेले आहेत. अॅपवरून हे दुकान कुठे आहे त्याचा तपास करता येतो व सामान खरेदी करायचे असेल तर ते घराजवळ बोलावता येते. दुकानातील कुठल्या वस्तू कुठे आहेत हे क्लाऊड तंत्राने समजू शकते. सामान खरेदीसाठी ग्राहकाला प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर बँक अकौंट डिटेल द्यावे लागतात. खरेदी केल्यानंतर अकौंटमधून पैसे डेबिट होतात. सामान निवडले की प्रथम अॅपमध्ये स्कॅन करून स्टोअरच्या बास्केटमध्ये ठेवायचे. दुकानात प्रवेश करण्याअगोदर बायोमेट्रीक डिटेल्स घेतले जातात व खरेदी संपली की ते नष्ट होतात.

ग्राहकाला हवे ते सामान दुकानात नसेल तरी काळजी करण्याचे कारण नाही. त्यासाठी एका बटण दाबावे लागते. या दुकानावर चार ड्रोन तैनात केली गेली आहेत. त्याच्या मार्फत तुम्हाला हवे असलेले सामान घरपोच दिले जाते.

Leave a Comment