रॉयल एनफिल्डने त्यांच्या खास कारणासाठी वापरल्या गेलेल्या स्टील्थ ब्लॅक ५०० बाईक्स विक्रीसाठी आणल्या आहेत. या बाईक्स एनएसजी ब्लॅक कॅट कमांडोनी देशातील १३ राज्यात ८ हजार किमी प्रवास करण्यासाठी वापरल्या आहेत. दहशतवादाविरोधात जागृती करण्याच्या अभियानासाठी ही रोड ट्रीप केली गेली होती. आता या बाईक विक्रीसांठी उपलब्ध करण्यात आल्या असून त्यांची किमत प्रत्येकी १ लाख ९० हजार रूपये आहे. या बाईक्सच्या विक्रीतून येणारी रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करणार्या स्वयंसेवी संस्थेला दिली जाणार आहे.
रॉयल एनफिल्डच्या खास स्टील्थ ब्लॅक ५०० बाईक्स विक्रीला
या बाईक्स रॉयल एनफिल्डच्या मायक्रोसेल वेबसाईटवर लॉग इन करून रजिस्टर करता येणार आहेत.१३ डिसेंबरपासून हा सेल सुरू होत असून या बाईकसाठी अधिकृत वॉरंटी दिली जाणार आहे. ५०० सीसी क्षमतेची ही बाईक फोर स्ट्रोक एअरकूल इंजिनसह आहे. तिला ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिली गेली असून रेस्ट्रो स्टाईलचे हे टॉप मॉडेल आहे.