मेक्लारेनची सुपरकार सेना सादर


फॉर्म्युला वन साठी रेसिंग कार बनविणार्‍या मॅक्लारेनने त्यांची नवी सेना सुपरकार सादर केली असून या कारचे नामकरण कंपनीचा लिजंट फॉर्म्युंला वन चालक एर्टन सेना याच्या नावावरून केले गेले आहे. ही कार प्रथम ट्रॅक वापरासाठीच तयार केली गेली होती मात्र आता ती रोडवरही चालविता येणार आहे. कारसाठी कार्बन फायबर मोनोलॉक चेसिस दिली गेली आहे.

या कारला ४.० लिटरचे ट्वीन टर्बो चार्ज व्ही ८ इंजिन, सात स्पीड ड्यूल क्लच ट्रान्समिशन सह दिले गेले आहे. कारचे वजन ११९७ किलो असून त्यात एअरोडायनामिक्स चा अतिशय उत्तम वापर केला गेला आहे. कारचे सर्व कंट्रोल मध्यवर्ती टचस्क्रीन सिस्टीमने ऑपरेट करता येतात. सीटमागे दोन रेसिंग हेल्मेट व सूट ठेवण्यासाठी जागा आहे. पुढच्या वर्षात या कारची डिलिव्हरी दिली जाणार असून या मॉडेलची ५०० युनिट बनविली जाणार आहेत. कारची किंमत ७,५०,००० पौंड म्हणजे ६ कोटी ४७ लाख रूपये आहे. कर वेगळे आकारले जाणार आहेत.मार्च मध्ये भरलेल्या जिनेव्हा मोटर शो २०१७ मध्ये ती सादर केली गेली होती.

Leave a Comment