देशातील या पेट्रोलपंपांवर मिळतो ५०% कॅशबॅक


पेट्रोल आणि डिझेलवरच्या खरेदीवर ग्राहकांना पेटीएम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ५० ट्क्के कॅशबॅक देणार आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या कोणत्याही पेट्रोल, डिझेल पंपावर या सवलतीचा फायदा घेता येणार आहे.

ग्राहकांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी पेटीएमद्वारे पैसे भरणे अनिवार्य असणार आहे. त्याचप्रमाणे किमान ३०० रुपयांचे इंधन ग्राहकांनी भरणेही गरजेचे असणार आहे. इंधन भरल्यानंतर प्रत्येक आठवड्याला लकी ड्राद्वारे तीन विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहे. यात जे तीन विजेते असतील त्यांना ५० % टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ३०० रुपयांपैकी १५० रुपये या विजेत्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या सवलीचा लाभ ग्राहकांना २८ डिसेंबरपर्यंत उठवता येणार आहे.

Leave a Comment