व्हाट्सअॅप आणत आहे खासगी मेसेजसाठी नवीन फिचर


जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स, व्हाट्सअॅपमध्ये काही नवीन फिचर येत आहेत. जे बरेच मनोरंजक असू शकतात. ही वैशिष्ट्ये Android, iPhone आणि वेब वापरकर्त्यांना देण्यात येतील. या फिचर्समध्ये टॅप टू अनब्लॉक, शेक टू रिपोर्ट, प्रायव्हेट रिप्लाय इन ग्रुप आणि इतर काही नवीन पर्याय समाविष्ट आहेत. अलीकडेच व्हाट्सअॅपमध्ये पिक्चर इन पिक्चर मोडमध्ये दिले होते, ज्या अंतर्गत चॅट करतात तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता.

WA बीटाइन्फोच्या, हे फिचर्स व्हाट्सअॅपच्या बीटा आवृत्तीमध्ये आधीपासून देण्यात आली आहेत. रिपोर्टनुसार, व्हाट्सअॅप वेब व्हर्जन २.७३१५ मध्ये दोन नवीन फिचर – प्रायव्हेट रिप्लाय आणि पिक्चर इन पिक्चर मोड दिले गेले आहेत. तर व्हर्जन २.१७.४२५, २.१७.४३६ आणि २.१७.४३७मध्ये तीन नवीन फिचर्स असतील, टॅप टू अनब्लॉक, शेक टू रिपोर्ट,आणि न्यू इन्व्हाईट लिंकचे ऑप्शन दिला जाईल.

यातील काही फिचर्स वेबवरील उपलब्ध असलेल्या व्हाट्सअॅपमध्ये येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण हे साफ आहे की व्हाट्सअॅपमध्ये हे नवीन फिचर्स मिळतील. दरम्यान व्हाट्सअॅपकडून याबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave a Comment