कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ‘नासा’ परग्रहावरील जीवांशी संवाद साधण्यासाठी करणार !


वॉशिंग्टन – ‘नासा’ ‘स्पेस कम्युनिकेशन’ तंत्रात सुलभता आणण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार असून ‘स्पेस कम्युनिकेशन’ मध्ये मानवी हस्तक्षेप विरहित तंत्राचा अवलंब करुन सुलभता आणि गतिमानता वाढविण्याकरता या पर्यायाचा अवलंब केला जाणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आजच्या घडीला विविध क्षेत्रात केला जातो. आधुनिक ‘स्पेस कम्युनिकेशन’ तंत्रात सध्या विविध सॉफ्टवेअर वापरली जातात. पण त्यांच्या वापरात जटिलता असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ‘कॉग्निटिव रेडिओ’ सारख्या मानवी हस्तक्षेप विरहित तंत्राचा अवलंब त्यावर पर्याय म्हणून केला जाणार आहे. सॅटेलाईटला कार्यवाही करणे यामुळे सुलभ ठरेल. तसेच मानवी हस्तक्षेप टाळता येईल, अशी माहिती नासाच्या वरिष्ठ संशोधक अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment