चीनची झोप उडवणार रामदेव बाबा


नवी दिल्ली – पतंजलीच्या माध्यमातून आजवर जगातील दिग्गज कंपन्यांना रामदेव बाबा यांनी धूळ चारल्यानंतर त्यांनी आता चीनकडे आपला मोर्चा वळविण्याचा इरादा केला आहे. आता त्यांची पतंजली कंपनी आयुर्वेद सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती करणार आहे.

बाबा रामदेव यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका चीनलाच बसणार आहे. कारण चीनच सध्या सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांची सर्वाधिक निर्मिती करतो. कंपनीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांनी यावर बोलताना म्हटले, सौर ऊर्जा पॅनलचे उत्पादन आम्ही सुरू केले असून ग्रेटर नोएडा औद्योगिक क्षेत्राजवळ याचा कारखाना असून याचे उद्घाटन जानेवारी महिन्यात होऊ शकते.

बालकृष्ण म्हणाले, १०० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रोजेक्टसाठी केली जाऊ शकते. यासाठी आम्ही साधारणपणे ५०-६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सौर ऊर्जा पॅनल आम्ही येथे तयार करणार आहोत. आम्ही चिप आणि फोटोवोल्टिक सेल तयार करण्याचाही विचार करत आहोत. सध्या आम्ही भारतीय कंपन्यांकडूनच यासाठी लागणारे साहित्य घेणार आहोत. मात्र, यानंतर आम्ही स्वतःच हे साहित्यही तयार करू. जर्मनी आणि चीनमधून मशिनरीज मागवून लावणे सुरू केले आहे, असेही बालकृष्ण म्हणाले.

Leave a Comment