नोबेल विजेते मॅक्स बॉर्न यांना गुगलची मानवंदना


नवी दिल्ली : गुगलने आज नोबेल विजेते मॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिवसानिमित्ताने डुडलच्या माध्यमातून मानवंदना वाहिली आहे. हे डुडल गेस्ट आर्टिस्ट काती झिलागी हिने तयार केले आहे.

११ डिसेंबर १८८२ ला जर्मनीत जन्मलेल्या मॅक्स बॉर्न यांना ‘फंडामेंटल रिसर्च इन क्वांटम मॅकेनिक्स’ साठी १९५४ साली त्यांना नोबेलने गौरविले गेले. त्यांची क्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रातील योगदानासाठी ‘बॉर्न थेरी’ आज क्वांटम फिजिक्सच्या प्रत्येक रिसर्चचा आधार असतो.

त्यांना विश्व विद्यापीठातून यहुदी असल्याकारणाने जानेवारी १९३३ मध्ये बाहेर काढण्यात आले. मॅक्स बॉर्न हे सी.व्ही.रमन यांचा प्रस्ताव स्वीकारुन बंगळूरूला आले. ते इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्थायी पद घेऊ इच्छित होते. पण त्यांच्यासाठी पद रिक्त न झाल्याने त्यांना परत जावे लागले.

Leave a Comment