बजाजची क्यूट भारतीय रस्त्यांवर धावण्याचा मार्ग मोकळा?


या वार्षिक वर्षाच्या अखेर वाहन जगाला अनोखा ट्विस्ट देणारी बजाजची क्यूट भारतीय रस्त्यावर धावेल असे खात्रीलायक वृत्त आहे. गेली पाच वर्षे लाल फितीत अडकल्याने ती भारतीय रस्त्यांवर उतरू शकली नव्हती.या वाहनाला आता चार चाकी वाहनाचा दर्जा दिला गेला असल्याचे समजते. २०१२ च्या दिल्ली ऑटो शो मध्ये ती आरई ६० नावाने सादर केली गेली होती मात्र त्यानंतरही भारतीय वाहन उद्योग नियमांनुसार तिला भारतात विक्रीची परवानगी दिली गेली नव्हती. बजाज या क्यूटची निर्यात करत असून ज्या ज्या देशात ती विकली जात आहे तेथे ती लोकप्रिय ठरली असल्याचे बजाजचे अध्यक्ष राजीव बजाज यांनी सांगितले. भारतात या कारच्या विक्रीला परवानगी न दिल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

दक्षिण पूर्व आशियात ही कार चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. ही खर्‍या अर्थान ग्रीन कार म्हणजे प्रदूषण कमी करणारी कार असल्याचे बजाज यांनी सांगितले. ते म्हणाले या कारला २१६.६ सीसीचे पेट्रोल इंजिन दिले गेले असून ती सीएनजी, एलपीजी व्हेरिएंटमध्येही उपलब्ध आहे. ही कार लिटरला ३७ किमीचे मायलेज देते तसेच वजनाला हलकी असल्याने इंधन बचत करते. ही कार अवघ्या १ लाख २८ हजार रूपयांत ग्राहकांना मिळू शकणार आहे. कार छोटीशी असल्याने पार्क करताना फार अडचण येत नाही तसेच ती कमी रूंदीच्या रस्त्यांतूनही सहज वळविता येते.

Leave a Comment