हे राजकुमार आहेत जगातील ‘ मोस्ट एलिजिबल बॅचलर्स ‘


ब्रिटनच्या शाही घराण्याचा राजकुमार हॅरी याचा विवाह मेगन मार्कल या अमेरीकन अभिनेत्रीसोबत निश्चित झाल्यानंतर त्याच्या अनेक महिला चाहत्यांचा प्रेमभंग झाला. त्याचबरोबर अशी आणखी काही देशांमधील राजघराणी आहेत, ज्यांच्यातील राजकुमार सध्या ‘ मोस्ट एलिजिबल बॅचलर ‘ म्हणून चर्चेत येत आहेत. दुबईचे शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशित अल मख्तूम हे दुबईचे राजकुमार आहेत. यांना प्रिन्स फजा या नावाने देखील ओळखले जाते. यांचे वय ३५ वर्षांचे असून, इन्स्टाग्राम वर अॅक्टिव्ह राहणे प्रिन्स फजा यांना पसंत आहे. यांचे सहा मिलियन फॉलोअर्स असून, प्रिन्स फजा यांना कविता करण्याचा छंद आहे.

जॉर्डनच्या राजगादीचे सर्वात आघाडीचे वारस असलेले प्रिन्स हुसैन २३ वर्षे वयाचे आहेत. २०१५ साली झालेल्या यूएन च्या सिक्युरिटी काऊंसिल च्या बैठकीत, वयाच्या विसाव्या वर्षी भाग घेणारे प्रिन्स हुसैन हे पहिले सभासद ठरले. जगभरातील अतिशय उच्चशिक्षित राजकुमारांपैकी प्रिन्स हुसैन एक आहेत.

ग्रीस आणि डेन्मार्क देशांच्या राजघराण्याचे राजकुमार फिलीपोज हे सध्याच्या काळात अस्तित्वात असलेल्या राजघराण्यांमधील राजकुमारांपैकी सर्वात देखणे म्हणून ओळखले जातात. प्रिन्स फिलीपोज यांनी आपले शिक्षण जॉर्जटाऊन विद्यापीठातून पूर्ण केले आहे.

ब्रुनेईच्या सत्तेचे वारस असणाऱ्या राजपरिवारातील सदस्यांमध्ये प्रिन्स मतीन सहाव्या स्थानावर आहेत. प्रिन्स मतीन २६ वर्षे वयाचे असून, यांनी लंडन विद्यापीठातून पदवी घेतली आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल स्टडीज अँड डिप्लोमसी या विषयामध्ये प्रिन्स मतीन यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. प्रिन्स मतीन यांना इन्स्टाग्राम वर अॅक्टिव्ह राहणे आवडते.

बेल्जियम देशाचे राजकुमार प्रिन्स जोआचिम २५ वर्षे वयाचे असून, बेल्जियम देशाची सत्ता हाती मिळणाऱ्या वारासांपैकी ते नवव्या स्थानावर आहेत. प्रिन्स जोआचिम यांना प्रसिद्धीच्या झोतात राहणे फारसे पसंत नाही. प्रिन्स जोआचिम यांचे शिक्षण लंडन आणि मिलॅन या दोन ठिकाणी झालेले आहे.

ग्रीस आणि डेन्मार्क च्या राजघराण्याचे राजकुमार प्रिन्स कॉस्टँटीन एलीक्सिओज एकोणीस वर्षांचे आहेत. त्यांना प्रिन्स टीनो या नावानेही ओळखले जाते. यांच्या परिवार खूप मोठा असून, प्रिन्स टीनो सध्या शिक्षण पूर्ण करीत आहेत. प्रिन्स टीनो यांना इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह राहणे पसंत आहे.

Leave a Comment