गरीबीमुळे विमानात कधीच न बसलेली मुलगी आज उडवते मोठे विमान


मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अॅनी दिव्या कधीच विमानात बसलेली नाही, पण आज ती जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानांपैकी असलेले बोईंग ७७७ हे विमान उडवणारी सर्वात तरुण महिला वैमानिक बनली आहे. ३० वर्षीय अॅनी जगातील सर्वात कमी वयाची एकमेव महिला कमांडर आहे. बोईंग 777 विमान इतके मोठे असते की यामध्ये ३५०-४०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात.

पंजाबमधील पठाणकोट येथे जन्मलेल्या अॅनीचे वडील सैन्यात एक सैनिक होते. ती जेव्हा १० वर्षाची होती तेव्हा वडिलांचे पोस्टिंग आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे झाले. पायलट बनण्याचे स्वप्न अॅनी लहानपणापासून पाहत होती, पण तिचे इतक्या सहजासहजी पूर्ण होणार नव्हते. वडिलांची आर्थिक परिस्थिती ऐवढी चांगली नव्हती की ते तिच्या पायलट अभ्यासासाठी १५ लाख देऊ शकत नव्हते. दरम्यान तिच्या वडिलांनी आपल्या मित्रांकडून काही पैसे उद्धार घेतले आणि बाकीचे पैसे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. अॅनी सांगते की माझ्या आईबाबांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. जे मी आज आहे, मी त्याबद्दल त्यांची आभारी आहे. फीची व्यवस्था केल्यानंतर अॅनीला उत्तर प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीतील फ्लाइंग स्कूलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिच्या समोरील आव्हान एवढ्यातच संपले नव्हते.

पायलटला वेगवेगळ्या देशांत जावे लागते आणि वेगवेगळ्या लोकांना भेटावे लागते म्हणूनच या क्षेत्रात इंग्रजीला फार महत्त्व आहे. अॅनीची इंग्रजी फार चांगली नव्हती, त्यामुळे तिची इंग्रजी सुधारण्यासाठी तिला तिच्या वर्गसोबत्यांसह आणि इतरांसोबत तोडक्यामोडक्या इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली. ती म्हणते की, सर्व प्रथम लोक माझ्यावर हसत होते, माझी टिंगलटवाळी करत होते. पण काही काळानंतर ते लोक माझ्या चुका सुधारू लागले. त्याचवेळी मी इंग्रजी बातम्या आणि चित्रपट पाहणे सुरु केले आणि संगीत ऐकणे सुरू केले. आज माझे इंग्रजी माझ्या हिंदीपेक्षा चांगले आहे.

अॅनी वयाच्या १७ व्या वर्षीच पायलट झाली होती. ती म्हणते, जेव्हा प्रशिक्षणादरम्यान मी पहिल्यांदाच विमान उडवले, तेव्हा असे वाटत होते की माझे स्वप्न सत्यात आले आहे. वयाच्या १९व्या वर्षी तिला एअर इंडियात नोकरी मिळाली. त्यावेळी बोईंग ७३७ विमान उडवले आणि वयाच्या २१व्या वर्षी तिने बोईंग ७७७ विमान उडवणे सुरू केले. अलीकडे, ती हे विमान उडवणारी सर्वात तरुण महिला वैमानिक बनली आहे.

आपले स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अॅनीने आपल्या भावा आणि बहीणीचे स्वप्न पूर्ण करण्यासही मदत केली. अॅनीची बहीण अमेरिकेत दंतवैद्य आहे आणि तिचा भाऊ ऑस्ट्रेलियात शिकत आहे. अॅनी सांगते की तिचा सर्वात मोठा प्रवास दिल्लीपासून सॅन फ्रांसिस्कोपर्यंत १८ तासांचा होता. तरुण आणि स्त्रिया असताना देखील काम करताना त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते? या प्रश्नाचे उत्तर देताना अॅनी सांगते की आव्हाने प्रत्येक कामात आहेत. पण मी कामावर लक्ष केंद्रित केले.

भविष्यातील योजनांवर अॅनी दिव्या सांगते की आता मी इतर लोकांना देखील पायलट होण्यासाठी प्रशिक्षण देऊ इच्छित आहे. त्याचबरोबर आपण अशा लोकांना मार्गदर्शन करू इच्छिते ज्यांना कमी माहिती आणि इतर आव्हानांमुळे ते आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. फार कमी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. कर्जाचा व्याजदर देखील खूप जास्त असतो. अभ्यासक्रमासाठी दिलेला कर्जावरील व्याजदर सरकारने कमी करावा.

ब-याच तरुणांना एक पायलट बनण्याचे स्वप्न आहे, परंतु योग्य मार्गदर्शन आणि अभाव नसल्यामुळे ते स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. अॅनी दिव्या त्यांच्यासाठी काही टिप्स देत आहे.

११ वी ते १२वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय ठेवा. पायलट अभ्यासक्रमासाठी किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. या व्यवसायासाठी वैद्यकीय फिटनेस आवश्यक आहे. जॉब मुलाखतीत वेळी अनेक चाचण्या होतात. नोकरी मिळविल्यानंतरही दरवर्षी परीक्षेला सामोरे जावे लागते, त्यामुळे सुरवातीपासून आरोग्य सेवेची काळजी घ्या. जर आर्थिक स्थैर्य असेल तर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. सतत आपल्या इंग्रजीवर काम करत रहा, हे खूप महत्त्वाचे आहे.