ड्रायव्हिंग लायसेन्स नसले तरी भरावा लागणार नाही दंड


तुम्ही जर ड्रायव्हिंग लायसेन्स विसरले असाल तर आता चिंता करण्याची गरज नाही आणि तुम्ही आता मोकळ्या मनाने काम करण्यास जाऊ शकता कारण पोलिस आता तुमच्याकडून लायसन्स नसल्याचा दंड वसूल करून शकणार नाही. आहे ना कामाची बातमी. पण हे कसे शक्य होईल हे तर जाणून घ्या…

खरं तर, सरकारने कोणत्याही कामासाठी लायसन्स किंवा इतर कागदपत्रांची हार्डकॉपी सोबत ठेवणे किंवा बाळगण्याची सक्ती काढून घेतली आहे. सरकारने यासाठीआपल्याला दुसरा पर्याय दिला आहे. याच्या मदतीने आपल्याला लायसन्ससोबत ठेवण्याची गरज नाही.

हे अवघड काम ‘Digilocker’ च्या मदतीने हे सोपे होणार आहे. ‘डिजीलॉकर’ म्हणजे ‘डिजिटल लॉकर’… या लॉकरमध्ये आपले सर्व महत्वपूर्ण दस्तऐवजांची सॉफ्ट कॉपी ठेवू शकता. डिजीलॉकरमुळे लोकांना दोन फायदे होतील, दस्तऐवज सुरक्षित राहतील. दुसरे म्हणजे त्यांच्याकडे हे लॉकर असेल तर ते लॉकर उघडून त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजांचा वापर करण्यास सक्षम असतील. या लॉकरमधील सुरक्षित सॉफ्ट कॉपी पूर्णपणे मान्य असेल, ती कोणीही स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. सरकारने तिला मान्यता दिली आहे.

डीजीलॉकर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना डिजिटल इंडियाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले जाते. डिजिटल लॉकरचे उद्दीष्ट महत्वाचे कागदपत्र जसे की जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आणि एजन्सी दरम्यान ई-दस्तऐवजांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देऊन भौतिक दस्तऐवजांचा वापर कमी करणे आहे.

डिजिटल लॉकरमध्ये ई-साईनची सुविधा देखील आहे जी डिजिटल स्वाक्षरीसाठी वापरली जाऊ शकते. गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी सरकारच्या सुमारे एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या डिजीलॉकर सेवेमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी नोंदणी केली आहे. आपण याचा लाभ देखील घ्यावा. ते तयार करण्याची प्रक्रिया सुलभ आहे.

Leave a Comment