अंगदुखी किंवा डोकेदुखीसाठी सतत अॅस्पिरीन घेणे सुरक्षित आहे का?


सततच्या धावपळीने किंव हवामानातील बदलामुळे उद्भविलेल्या अंगदुखी किंवा डोकदुखीसाठी आपण अॅस्पिरीन घेत असतो. हेच औषध बाजारामध्ये डीस्प्रीन नावाने उपलब्ध आहे. घराघरामध्ये, अंगदुखी किंवा डोकेदुखी उद्भाविली तर हाताशी असावी म्हणून डीस्प्रीन हमखास ठेवलेली आढळतेच. ह्या गोळीमध्ये असलेली औषधे अंगदुखी, डोकेदुखी कमी करतात, ताप हटविण्यास मदत करतात. ‘एकोस्प्रीन’ ही गोळी देखील अॅस्पिरीनचाच एक प्रकार आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास या गोळीचा फायदा होतो, तसेच काही वेळा कर्करोगाच्या उपचारांसाठी देखील अॅस्पिरीन वापरली जात असते. त्यामुळे गरज लागेल तेव्हा अॅस्पिरीनचे सेवन करावे किंवा नाही, याचा विचार अवश्य व्हायला हवा.

यूएन प्रीव्हेन्टीव्ह टास्क फोर्स च्या मते, पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांमधील दहा टक्के लोकांना कार्डीयो-व्हॅस्क्यूलर डिसिजेस होण्याची संभावना असते. त्यामुळे अश्या लोकांनी अतिशय कमी प्रमणात अॅस्पिरीनचे सेवन करावयास हवे. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किंवा कोलन कॅन्सर होण्याची संभावना कमी होते. भारतीय लोकांमध्ये ही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त प्रमाणात आढळतो. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या बाबतीत असा धोका आढळतो, त्यांना अॅस्पिरीन घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

अॅस्पिरीनच्या सेवनाने रक्त पातळ होत असते. आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. अॅस्पिरीनच्या सेवनाने धमन्यांमधील हे अडथळे दूर होऊन रक्त पातळ राहते, व हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका काही अंशी कमी होतो. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की अॅस्पिरीन मुळे रक्त पातळ होत असल्याने, काही कारणाने जर व्यक्तीस इजा झाली, तर त्यातून होणारा रक्तस्राव पटकन थांबत नाही. जिथे इजा झाली आहे तेथे प्लेटलेट्स आपसात जुळून न आल्याने रक्तस्राव होत राहण्याचा धोका निर्माण होतो, आणि रक्तस्राव थांबला तरी जखम लवकर भरून येत नाही. त्याशिवाय अॅस्पिरीनच्या अतिसेवनाने पोटामध्ये अल्सर्स निर्माण होण्याची देखील संभावना असते.

जगभरातील अनेक मेडिकल सोसायटीज् मध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना ७५ मिलीग्राम अॅस्पिरीन घेण्याचा सल्ला देण्यात येतो. विशेषतः ज्यांना उच्चरक्तदाब, हाय कोलेस्टेरोल, डायबेटीस यांसारखे विकार असतील, त्यांना अॅस्पिरीन किंवा एकोस्प्रीन घेण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. पण स्वतःच्या मनाने, केवळ अंगदुखी किंवा डोकेदुखीकरिता सतत अॅस्पिरीन घेणे धोक्याचे ठरू शकते. तसेच, ज्यांना डॉक्टरांनी अॅस्पिरीन नियमित घेण्यास सांगितले आहे, अश्या व्यक्तींनी स्वतःच्या मनाने, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावाचून अॅस्पिरीन घेणे सोडू नये. त्याचबरोबर डॉक्टरांनी सांगितलेले आहाराचे पथ्य पाळणे देखील गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment