सव्वाशे वर्षांच्या आजीबेन मतदानाच्या सदिच्छा दूत


गुजराथेत आज होत असलेल्या विधानसभा मतदानात राजकोट विभागातील उपलेटा गावच्या आजीबेन चंद्रवाडिया या १२६ वर्षांच्या महिला मतदार मतदानाचा हक्क बजावत असून त्या देशातील सर्वात वयोवृद्ध माहिला असल्याचा दावा केला जात आहे. २००७ च्या निवडणुकीत आजीबेन यांचे वय ११६ वर्षे नोंदविले गेले होते त्यावरून राजकोट कलेक्टर विक्रांत पांडे यांनी आजीबेन यांच्या संदर्भातली सर्व चौकशी करून त्यांच्या वयाची खात्री करून घेतली व त्यांना मतदानासाठी सदिच्छा दूत म्हणून नियुक्त केल्याचे समजते.

आजीबेन यांची प्रकृती या वयातही उत्तम असून त्यांनी आयुष्यात कधीच दवाखान्याची पायरी चढलेली नाही. वयानुसार त्यांची स्मरणशक्ती थोडी कमी झाली आहे. त्या ८-१० वर्षांच्या होत्या तेव्हा फार दुष्काळ पडला होता अशी त्यांची आठवण आहे. त्यांनी देशात राजेशाही अनुभवली आहे व लोकशाही पण. आज त्या मतदान करून मतदानाचे महत्त्व लोकांना पटवून देणार आहेत.

Leave a Comment