प्रचारावर साडेतीन वर्षात मोदी सरकारचा ३७५४ कोटींचा खर्च


गुजराथ विधानसभा निवडणुकांसाठी आज दुसर्‍या टप्प्याचे मतदान होत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून २०१४ ते आक्टोबर २०१७ या काळात या सरकारने प्रचारावर ३७५४ कोटी रूपये खर्च केल्याचे माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती हक्क अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले आहे.

माहिती प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या काळात मोदी सरकारने ३७,५४,०६,२३,६१६ रूपये खर्च केले असून त्यात इलेक्ट्राॅनिक मिडीया,प्रिंट मिडीया, आऊटडोर पब्लिसिटी यांचा समावेश आहे.इलेक्ट्राॅनिक मिडीयावर १६५६ कोटी खर्च केले गेले असून त्यात डिजिटल सिनेमा, दूरदर्शन, इंटरनेट, मेसेज, टिव्ही वाहिन्या यांचा समावेश आहे. प्रिट मिडीयावर १६९८ कोटी खर्च झाले असून आऊटडोर पब्लिसिटी, होर्डिंग, पोस्टर, बुकलेट, कॅलेंडर यांच्यावर ३९९ कोटी खर्च केले गेले आहेत. ही रक्कम अनेक मंत्रालयांच्या वार्षिक बजेटपेक्षाही अधिक असून या काळात प्रदूषण जागृतीवर केवळ ५६.८ कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment