चिनी हॅकर्सकडून भारताला धोका- फायरआयचा इशारा


सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील कंपनी फायरआयने जगभरात बदनाम असलेल्या चिनी अॅडव्हान्स परसिस्टंट थ्रेट एटीपी ग्रुपकडून भारत व हाँगकाँग या देशांना लक्ष केले जाईल असा इशारा दिला आहे. पुढच्या वर्षापासून यामुळे भारतीय कंपन्यांना अधिक सावध राहावे लागेल असेही त्यांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारात पेचिंगच्या वाढत्या प्रभावाचा धोका म्हणून या ग्रुपकडे पाहिले जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

ज्या हॅकर ग्रुप्सना सरकारकडून मदत दिली जाते त्यांना एटीपी म्हटले जाते. सध्या राजकीय परिस्थिती खूपच बदलती आहे व त्यामुळे अशा हॅकर्सचा धोका वाढला आहे. भारतीय कंपन्यांना या संदर्भात अगदी आवश्यक असलेल्या सुरक्षेची माहिती नाही. म्हणजे हे हल्ले कोठून होतील, कोण करतील व हे ग्रूप काम कसे करतात याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. ज्या कंपन्यांकडे महत्त्वाचा व भरपूर प्रमाणात डेटा आहे त्या कंपन्या अशा हल्ल्यांची शिकार बनू शकतात. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत रशियन हॅकर्सनी घातलेला गोंधळ ताजा आहे म्हणजेच या हॅकर्स ग्रुप कडून लोकशाही असलेल्या देशांना अधिक धोका संभवतो असेही फायरआयचे म्हणणे आहे. भारत, दक्षिण कोरिया, जपान, फिलिपिन्स, व्हिएतनाम या देशांना हॅकर्सचा धोका अधिक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment