लँड रोव्हरची ऑटोबायोग्राफी बेस्टोक भारतात दाखल


ब्रिटनची कार निर्मिती कंपनी लँड रोव्हरची नवी अपडेटेड एसयूव्ही रेंज रोव्हर आटोबायोग्राफी बेस्टेाक भारतात विक्रीसाठी दाखल झाली असून या कारची फक्त पाच युनिट येथे आणली गेली आहेत. भारतात विक्रीसाठी आलेली ही टॉप मॉडेल कार कस्टमाईज करता येणारी आहे. या कारची एक्स शो रूम किंमत २ कोटींपासून सुरू होते आहे.

जग्वार लँड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सूरी म्हणाले, भारतात ही कार आल्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. या कारला देण्यात आलेल्या कस्टमाईज ऑप्शनमुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार उत्तम दर्जाची कार मिळणे शक्य होणार आहे. रिटेलर अथवा प्लांटमध्ये ही कार कस्टमाईज करून घेता येईल. यात ग्राहकाच्या आरामाची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. मागच्या सीटसाठी भरपूर स्पेस दिली गेली आहे.

ही कार ४.४ लिटर डिझेल व ५.० लिटर पेट्रोल सुपरचार्ज्ड व्ही ८ इंजिन अशी दोन्ही व्हेरिएंटमध्ये असून ती ० ते १०० किमीचा वेग अवघ्या ५.४ सेकंदात घेते. ही कार हायटेक फिचर्सनी परिपूर्ण असल्याचेही सूरी यांनी सांगितले.

Leave a Comment