कुंभमेळा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत


नवी दिल्ली : आता जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारतातील कुंभमेळ्याला जागतिक दर्जा प्राप्त झाला असून कुंभमेळा हा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असल्याचे संयुक्त राष्ट्रांचा घटक असलेल्या ‘युनेस्को’ने जाहीर केले आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये याआधी योग आणि नवरोझ (पारशी नववर्ष) यांचा समावेश सांस्कृतिक वारशांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. भारतात कुंभमेळा नाशिकसह अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी भरतो. पूर्ण कुंभमेळा १२ वर्षांनी तर अर्धकुंभमेळा सहा वर्षांनी भरतो. कुंभमेळाला सांस्कृतिक वारसा हा दर्जा मिळाला असला तरी मात्र कुंभमेळ्यावर भारतात प्रचंड टीका करण्यात येते. कुंभमेळ्यात भरपूर पाणी वाया जाते, तसेच कुंभमेळ्यामध्ये काही विधायक कार्य होत नाही अशीही टीका केली जाते. अनेक साधू बैरागी कुंभमेळ्याला एकत्र येतात. गेली कित्येक वर्ष कुंभमेळे अविरतपणे चालू आहेत.

Leave a Comment