जेरूसलेम- इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चनधर्मियांसाठी पवित्र शहर


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता देऊन अमेरिकेचा तेल अवीव येथला दूतावास जेरूसलेमध्ये हलविण्यात येत असल्याचे जाहीर केल्यापासून हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वास्तविक ज्यू, इस्लाम व ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेले हे शहर गेली अनेक शतके अशांततेत होरपळून निघते आहे.

जगातील सर्वात जुन्या शहरात जेरूसलेमचा समावेश होतो. याच शहराला येरूसलेम असेही म्हणतात. जगात वसाहतीची सुरवात याच शहरापासून झाली असा दावाही केला जातो. इस्त्रायलची १९४८ साली स्वतंत्र देश म्हणून स्थापना झाल्यानंतर या शहराची फाळणी होऊन एक भाग इस्त्रायलची राजधानी बनला मात्र १९६७ साली झालेल्या ६ दिवसांच्या युद्धात इस्त्रायलने हे संपूर्ण शहर ताब्यात घेतले व ते आजतागायत त्यांच्याच ताब्यात आहे.

शहराच्या पूर्व भागात ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम धर्मियांसाठी पवित्र स्थळे आहेत. इस्लाम धर्मातील तीन नंबरची पवित्र मशीद अल अक्सा येथेच असून पैगंबर मक्केहून रात्री प्रवास करून येथे आले व त्यांनी सर्व पैगंबरांसाठी प्रार्थना केली असा विश्वास आहे. ख्रिश्चनांचा प्रमुख ईसा मसीहा याला येथेच सुळावर चढविले गेले व येथेच त्याचे पुनरूत्थान झाले असेही सांगितले जाते. येथील चर्च ऑफ होली सेकपलर हे त्याचेच प्रतीक मानले जाते तर ज्यूंची पवित्र वेर्स्टन वॉल हे त्यांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे. जगातले हे पहिले शहर मानले जाते. ज्यूंची ही वॉल त्यांच्या पवित्र मंदिराची भिंत आहे असे मानले जाते.

हे शहर आज पूर्णपणे इस्त्रायलच्या ताब्यात असले तरी येथे या तिन्ही धर्मांचा रंग अनुभवता येतो. येथील पाककला, इमारती, अनेक पर्यटक स्थले यांवर त्यांची छाप स्पष्टपणे दिसून येते.

Leave a Comment