हुवाई आणणार ४० मेगापिक्सल कॅमेऱ्याचा स्मार्टफोन


लवकरच आपला एक जबरदस्त स्मार्टफोन हुवाई कंपनी बाजारात लॉन्च करणार असून तीन लेंस असलेला ४० मेगापिक्सल कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. हुवाईच्या Next Gen P-सीरिज संदर्भात काही ठराविक माहिती समोर आली आहे.

येत्या काळात कंपनी आपल्या P- सीरिज स्मार्टफोन्सच्या जाहिराती ऑनलाईन पहायला मिळत आहेत. फोनमध्ये तीन लेंस असलेला ४० मेगापिक्सल कॅमेरा, 5X हायब्रिड झुमिंग आणि २४ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असल्याची माहिती या जाहिरातींच्या माध्यमातून समोर आली आहे. कॅमेऱ्यांची कंपनी Leicaची हुवाईने या स्मार्टफोनसाठी मदतही घेतली आहे. हुवाई पी१० आणि हुवाई Mate१० च्या कॅमेऱ्यावर या कंपनीने काम केले आहे. हुवाई पी११ असे या नव्या स्मार्टफोनचे नाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या हुवाई पी१० स्मार्टफोनमध्ये ड्युअल लेंस (२० मेगापिक्सल + १२ मेगापिक्सल) रियर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता.

Leave a Comment