स्मार्टफोनमधून डिलीट झालेले ‘संस्मरणीय क्षण’ चुटकीसरशी मिळवा परत


नवी दिल्ली: आपल्या आयुष्यातील ‘संस्मरणीय क्षण’ आपल्या कायम लक्षात रहावे यासाठी सध्या स्मार्टफोनच्या साहायाने आपण फोटो काढतो. पण आपल्या नको असलेले फोटो डिलीट करण्याच्या नादात आपण आपले संस्मरणीय फोटो देखील डिलीट करतो. ज्यामुळे आपल्याला फार दु:ख होते. कारण एकदा निघून गेलेला क्षण आपल्या वाट्याला कधीच येणार नाही. पण आजच्या युगात सर्वकाही शक्य आहे. असे बरेच अॅप्स आहेत जे जुने फोटो आपल्याला पुन्हा मिळवून देतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा अॅपबाबत सांगणार आहोत जे तुम्हाला काही सेकंदात तुमचे डिलीट झालेले फोटो तुमच्या फोनमध्ये परत आणून देईल.

डिस्क डिगर फोटो रिकव्हरी (Disk Digger photo recovery) जे स्मार्टफोनमधून डिलीट झालेले फोटो तुम्हाला परत मिळवून देईल. आपण आता संपूर्ण प्रक्रिया समजावून घेऊया.

* सर्व प्रथम हे अॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे.
* इन्स्टॉलेशन नंतर, बेसिक फोटो स्कॅनचा पर्याय असेल. आपल्याला त्यावर क्लिक करावे लागेल
* ज्यानंतर प्रक्रिया सुरू होईल आणि आपण हटविलेले फोटो दिसू लागतील.
* फोटो रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला फोनवर रुट करण्याची आवश्यकता नाही.
* आपण या अॅपवर डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओ देखील मिळवू शकता.
* डिलीट झालेले फोटो आपण ड्रापबॉक्स आणि ईमेल द्वारे सुद्धा पाठवू शकता.

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर बरेच लोकप्रिय झाले असून आहेत. डिफ्युट टेक्नॉलॉजीजने हे अॅप तयार केले आहे. गुगल प्लेने या अॅपला ५ पैकी केवळ ४.१ रेटिंग दिलेली आहे. हे अॅप आतापर्यंत ५ कोटी पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे.

Leave a Comment