आधारमुळे आता घरपोच मिळणार दारू


दारू पिणाऱ्या तळीरामांसाठी एक चांगली बातमी आहे. तळीरामांना आता दारू खरेदी करण्यासाठी वाईन शॉपमध्ये जाण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला दारू घरपोच मिळणार आहे. तत्पूर्वी, एका कंपनीने डिझेल खरेदीची सेवा सुरू केली होती.

आपल्याला घरपोच दारू मागवण्यासाठी अॅपच्या माध्यमातून ऑर्डर करावी लागणार आहे. देशात अशा प्रकारची सेवा पहिल्यांदाच सुरु करणारी स्टार्टअप कंपनी बंगळूरूमधील असून हिपबार हे सेवा त्यांनी सुरु केली आहे. स्टार्टअप कंपनीने असा दावा केला आहे की त्यांना हे करण्यासाठी कठोर नियम केले आहेत, ज्यानंतरच लोकांना दारू देण्यात येईल.

कंपनीने बनवलेल्या नियमांनुसार केवळ २१ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना दारू दिली जाईल. दारू घरपोच मिळविण्यासाठी लोकांना ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, पॅन कार्ड, व्होटर आयडी कार्ड, पासपोर्ट इ. सारखे याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. सर्वप्रथम लोकांकडून आधार मागितले जाईल आणि त्यानंतर डिलिव्हरी देणारा व्यक्ती त्यांच्या डिव्हाइसवर प्रमाणित करेल. ऑनलाईन पडताळणीनंतर डिलिव्हरी एजंट ग्राहकांना दारू देईल.

या अॅप्लीकेशनच्या सहाय्याने लोकांना कमीतकमी ५०० रुपयांची दारू मागवावी लागणार आहे. याशिवाय दुपारी २ ते १० दरम्यानच दारू वितरित करण्यात येईल. सध्या बंगळूरूमध्ये याच्वेलेत दारू उपलब्ध करून दिली जाते. ही ऑर्डर केवळ घरीच वितरित केली जाईल. दारू कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यालयात वितरित केली जाणार नाही. अॅपवर तुमच्या डिव्हाइस लोकेशनच्या पट्ट्यातील ३ किलोमीटरच्या आतमधील स्टोअरमधून तुम्हाला दारू वितरित केली जाईल.

बंगळूरूमध्ये या कंपनीने ८० पेक्षा जास्त बार आणि १०० स्टोअर्ससोबत हातमिळवणी केली आहे जे ही सेवा पुरवणार आहेत. यासाठी कंपनीने जवळपास ७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीला रिझर्व्ह बँकेकडून मोबाइल वॉलेटचे परवाने मिळाले आहेत.

Leave a Comment