या फोनसोबत जिओ देणार १ वर्षासाठी मोफत कॉलिंग आणि ७५० जीबी डेटा


एका वर्षासाठी फ्री कॉलिंग आणि ७५० जीबी डेटा रिलायन्स जिओ देत असून जिओचा स्पेशल प्लॅन फक्त निवडक ग्राहकांसाठी असून जे ग्राहक गुगल पिक्सल २ स्मार्टफोन विकत घेतील, त्यांनाच ही स्पेशल ऑफर दिली जाणार आहे. ग्राहक या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग, एसटीडी आणि रोमिंग फ्री याचा फायदा घेऊ शकतात. यासह ७५० जीबी डेटा फ्री दिला जाणार आहे. प्लॅनची वैधता ३६० दिवस राहणार असून फ्री जिओ अॅपसह नॅशनल आणि लोकल मेसेज फ्री मिळणार आहेत. जिओच्या या प्लॅनची एकूण किंमत ९,९९९ रुपये आहे.

जर थांबा जिओची ही ऑफर येथेच संपत नाही. यासाठी तुम्ही एचडीएफसी क्रेडीट कार्डने पेमेंट केल्यास ८,००० रुपये कॅश बॅक मिळेल. तसेच ५,००० रुपयांचे अॅडिशनल एक्सचेंज बोनस दिला जाईल. त्यासाठी तुमचा जुना मोबाईल एक्सचेंज करावा लागेल. ग्राहकांचा या ऑफरमध्ये एकूण २२,९९९ रुपयांचा फायदा होणार आहे. म्हणजे केवळ ९,९९९ रुपये खर्च करुन मोठा फायदा मिळणार आहे.
जिओ स्वस्त ४जी प्लॅननंतर अशा प्रकारच्या ऑफर बाजारपेठेत आणत आहे. त्यासाठी काही स्मार्टफोनसह टायअप करण्यात आला आहे. आता जाणून घ्या गुगलच्या स्मार्टफोन विषयी. गुगल पिक्सल २ आणि गुगल पिक्सल २ XL गुगलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनपैकी एक आहेत. ही ऑफर या फोनवर आहे. पिक्सल २ची किंमत ६१,००० रुपये आणि पिक्सल २ XL ची किंमत ७३,००० हजार रुपये आहे.

याफोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आहे. त्याचे रेझोल्युशन १९२०/१०८० पिक्सल आहे. या डिस्प्लेवर कॉर्निंग ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगनचे ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. हा फोन अॅंड्राईड 8.0 ओरियो वर काम करतो. यात एलइडी प्लॅशसह १२.२ मेगापिक्सलचा रिअर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 2700mAh बॅटरी असून ती फास्ट चार्जिंगला सर्पोट करते.