या यशस्वी क्रिकेटपटूचे वडील होते सिक्युरिटी गार्ड


६ डिसेंबर म्हणजे कालच टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा २९ वर्षांचा झाला आहे. अगदी गरीब कुटुंबातून आलेला हा क्रिकेटर आज सेलिब्रिटी बनला आहे. एक नव्हे, तर दोन-दोन ऑडी कार त्याच्या घरी आता आहेत. त्याला २०१६मध्ये ९७ लाख रुपये किमतीची ऑडी क्यू ७ मिळाली होती. त्याला ही गाडी त्याच्या सासऱ्यांनी लग्नात भेट म्हणून दिली होती.

गुजरातचे एक छोटेसे गाव नवागाम येथे रविंद्र जडेजाचा जन्म झाला. त्याचे वडील एक सुरक्षा रक्षक होते. तर आई नर्स होती. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने क्रिकेटर होण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. जडेजाच्या आईची इच्छा होती की त्याने क्रिकेटर व्हावे. तर वडिल त्याला संरक्षण दलात पाठवण्याची तयारी करत होते.

जडेजाच्या आईचे २००५मध्ये अपघाती निधन झाले. तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक धक्का होता. यामुळे क्रिकेटपासूनही तो दुरावला होता. यानंतर त्याच्या बहिणींनीच त्याला परत खेळण्याची प्रेरणा दिली आणि तो आज स्टार इंडियन क्रिकेटर बनला आहे. आता त्याच्या दोन्ही बहिणी त्याचा रेस्टॉरंटचा बिझनेस सांभाळतात. २ ऑडी कार जडेजाकडे असून त्यापैकी एकाची किंमत ९७ लाख असून जी त्याला त्याच्या सासऱ्यांनी दिली होती. तत्पूर्वी त्याच्याकडे ऑडी क्यू-३ कार होती. जडेजाच्या फार्म हाऊसवर आलीशान घोडे देखील आहेत.

सौराष्ट्रच्या अंडर-१४ टीममध्ये खेळण्याची संधी जडेजाला २००२ मध्ये सर्वप्रथम मिळाली. त्याने महाराष्ट्र विरोधात ८४ धावा करून ४ विकेटही घेतल्या होत्या. त्याची १५ वर्षांचा असताना सौराष्ट्राच्या अंडर-१९ टीममध्ये निवड झाली. याच फॉरमॅटमध्ये त्याने करिअरचे पहिले शतक लावले. यानंतर २००५मध्ये त्याची अंडर-१९ विश्वचषकासाठी निवड झाली. त्याने २००९मध्ये एकदिवसीय आणि टी-२०त पदार्पण केले. तर त्याने २०१२मध्ये आपल्या कारकिर्दीतला पहिला कसोटी सामना खेळला.

Web Title: The security guard was the father of this successful cricketer