भारतात उघडले पहिले कुत्र्यांसाठीचे हॉटेल


कुत्रा प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे, ज्यांना त्यांचे लाड करणे खूप आवडते. होय, भारतात प्रथमच कुत्र्यांसाठी एक हॉटेल उघडण्यात आले आहे. गुरुग्राममध्ये उघडलेल्या या हॉटेलचे नाव Critterati असे आहे. या हॉटेलमध्ये लक्झरी स्यूट देखील आहे, ज्यामध्ये व्हेलवेट बेड, टीव्ही आणि आपल्या प्रिय कुत्र्यासाठी खासगी बाल्कनी देखील आहे. या हॉटेलचे भाडे सुमारे ४५०० रुपये इतके आहे.

हॉटेलच्या छतावर कुत्र्यांसाठी जलतरण तलाव देखील तयार करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आयुर्वेदिक तेलांनी येथे कुत्र्यांचा मसाज देखील केला जातो. हॉटेलमध्ये २४-तास पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. येथे एक ऑपरेशन थिएटर देखील बांधण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रत्येक वेळी वैद्यकीय युनिट उपलब्ध आहे.

या हॉटेलमध्ये कुत्र्यांसाठी एक प्ले रूमदेखील तयार करण्यात आले आहे. येथे एक कुत्रा कॅफे आहे ज्यामध्ये कुत्र्यांचे खाद्यपदार्थ दिले जातात. या कॅफेच्या मेनूमध्ये भात-चिकन, मफिन, पॅनकेक्स आणि आइस्क्रीम यासारख्या बर्याच गोष्टींचा समावेश आहे. एवढेच नाही तर, कुत्र्यांकरिता अल्कोहोल विरहीत बेल्जियन बिअरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

हॉटेलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चावला सांगतात की त्यांनी हे होतले कुत्रा प्रेमींसाठी उघडले असून ज्यामुळे ते आपल्या कुत्र्यांना लक्झरी सेवा देऊ शकतील. त्यांनी डेली मेलला सांगितले, येथे अनेक गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. दिवसाची सुरुवात सात वाजता पॉटी ब्रेकने होते त्यानंतर नाश्ता, पुन्हा पॉटी ब्रेक त्यानंतर दोन तासांनी प्ले सेशन त्यानंतर स्वीमिंग सत्र आणि कॅफे टाईमसोबतच प्ले सेशन होते.

Web Title: The first dog hotel to be opened in India