१० वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या फोटोमुळे स्टार झाला होता हा मुलगा


सोशल मीडियावर असे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत जे एका क्षणीच लोकप्रिय झाले आहेत. बऱ्याच वर्षांपासून मीम्सने लोकांचे मन जिंकले होते. ज्यात एका मुलाचे फोटो खूप व्हायरल झाले होते. मीम्सपासून अनेक लोकांनी त्यामुलाचा फोटो आपला प्रोफाईल फोटो बनविला. पण या फोटो मागील सत्य थोडे भावनिक आहे. होय, या सुंदर छायाचित्राच्या मागे एका पत्नीची वेदना असून जिला आपल्या पतीच्या उपचारांसाठी खूप पैसा हवा होता. पण या फोटोमुळे त्यांचे नशीबच बदलून गेले आणि हा मुलगा या फोटोमुळे स्टार बनला. चला तर मग जाणून घेऊया…

या मुलाचे नाव सॅमी ग्रीनर असे असून जो जॅकसनविल, फ्लोरिडा येथे राहते. जेव्हा तो १० महिन्यांचा होता तेव्हा त्याच्या आईने म्हणजेच लानी ग्रीनर हिने हा फोटो क्लिक केला होता. हे फोटो फेसबुकवर अद्याप स्क्रोल होताना दिसत आहे. तिने हे फोटो फ्लिकरवर पोस्ट केले. जिथे हे फोटो बरेच व्हायरल झाले. आता हा मुलगा ११ वर्षांचा आहे. जेव्हा तिने सॅमीचा नवीन फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आणि सांगितले की तो मुलगा आता असा दिसतो, तेव्हा हा फोटो २० लाख वेळा पाहिला गेला.

एबीसीच्या बातम्या नुसार, या फोटोवर क्लिक करण्यामागे सॅमीचे वडीलांचे उपचार करण्याचा उद्देश होता. सॅमीच्या वडिलांचा मूत्रपिंड खराब झाला होता. पण डायलेसीस करण्यासाठी त्याच्या बायकोकडे पैसे नव्हते. मग तिला सॅमीच्या माध्यमातून पैसे कमवण्याची कल्पना मिळाली आणि त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केले. सॅमीच्या लोकप्रियतेमुळे त्याच्या वडिलांवर उपचार होऊ शकले.